Welcome!

A Taste To Share !!!
AnyTime – AnyWhere

Bhadang is a spicy snack made with  Kurmura, Murmura or Puffed Rice. In addition, it has peanuts, and dried coconut or kopra, and is spiced with red chilli powder. Each bite reveals the flavours of the spices that appeal to your taste buds. Bhadang from Sangli and Kolhapur is a favourite in India.
It is one of the pleasures to eat handfuls of this spicy crunchy mix as it is or enjoy as a namkeen with tea.Else it can be spiked with chopped onions, coriander with a squeeze of lemon juice on it .

Food License Number – 1151804000533

History  Of  Bhadang

'भंडग' च्या जन्माची खमंग गोष्ट

‘भणंग’ची झाली

भडंगची जन्मभूमी सांगली

प्रारंभी भडंगला नव्हती फारशी प्रतिष्ठा

रात्रीच्या कार्यक्रमात होत असे भडंग पार्टी

‘भणंग’ आणि ‘भुनंग’ या नावाने भडंगची ओळख

खमंग आणि तिखट-गोड चवीने देशातीलच नव्हे तर जगभरातील चोखंदळ खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या ‘भडंग’ या पदार्थाची जन्मभूमी सांगली आहे. बुध्दीबळाच्या खेळावेळी चिरमुरे, शेंगदाणे आणि तेल-तिखट लावून हा पदार्थ तयार झाल्याचे सांगण्यात येते. सुमारे 80-90 वर्षांपूर्वी तयार झालेल्या या पदार्थाला प्रारंभी फारशी प्रतिष्ठा नव्हती. गप्पांच्या मैफिली, रात्री होणारे जागरण-गोंधळ, बुध्दीबळाचे रात्रभर चालणारे सामने अशा ठिकाणीच भडंगाचा आस्वाद घेतला जात असे. प्रारंभी या भडंगला ‘भणंग’ अथवा ‘भुनंग’ या नावाने ओळखले जायचे. भडंग या पदार्थांची मनोरंजक कहाणी सांगणारी सन 1940 च्या दशकातील काही अस्सल कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत. यामध्ये रात्रीच्या मैफिलीच्या खर्चाचा हिशोब देताना वीडी-काडी, चहा-पाणी, पान-तंबाखू यांच्या जोडीला ‘भणंग’चाही हिशेब केलेला आढळतो. 1950 च्या दशकानंतर या ‘भणंग’लाच ‘भडंग’ या नावाने ओळखले जावू लागले. भडंगच्या जन्माची ही कहाणी त्याच्या चवीप्रमाणेच खमंग आणि रोचक अशी आहे.

भडंग हा सांगलीचा ब्रँड पदार्थ

चिरमुऱ्यापासून बनलेला भडंग हा पदार्थ ही सांगलीची खासियत आहे. सांगलीला कोणी पाहूणा आला तर, त्याचा हमखास पाहूणचार भडंग देऊनच करण्याची इथली पध्दत आहे. बाहेरुन आलेल्या पाहूण्यांनाही हा खमंग आणि रुचकर पदार्थ इतका आवडतो की ते परत आपल्या गावी जाताना सांगलीचा भडंग हमखास घेऊन जातातच. सुरूवातीला सांगली आणि परिसरापूरता मर्यादीत असलेल्या भडंगने आता राज्याच्याच नव्हे तर देशाच्या सीमा उल्लंघून जगभरातील चोखंदळ खवय्यांची रसना तृफ्त केली आहे.

जगभरात भडंगचे खवय्ये

सांगलीतील भडंगच्या बाजार पेठेने भव्य स्वरुप धारण केले आहे. दररोज लाखो रुपयांची भडंग विक्री होते. भडंगचे अनेक लोकप्रिय ब्रँड सांगलीत उदयास आले आहेत. या कंपन्यांची भडंग जगभरात पोहचली आहे. अस्सल सांगलीकर या खमंग भडंगचा अभिमान बाळगत येणाऱ्या पाहूण्यांची सरबराई या विशेष पदार्थानेच करत असतो. आज भडंग हा पदार्थ जरी वेगवेगळ्या गावांत तयार होत असला तरी त्याची जन्मभूमी सांगली आहे, याची माहिती फारच थोड्या लोकांना आहे.

बुध्दीबळाच्या खेळात झाला भडंगचा जन्म

भडंगच्या जन्माची कहाणी ही त्याच्या चवीप्रमाणेच खमंग आणि रोचक आहे. सांगली हे शहर एकेकाळी बुध्दीबळ खेळासाठी प्रसिध्द होते. मेहंदळे, पडसलगीकर, गोरे, म्हैसकर, परांजपे, जोशी असे नामांकीत बुध्दीबळ पटू येथे तयार झाले. या बुध्दीबळपटूंमध्ये मोठी स्पर्धा असे. रात्र-रात्रभर ते बुध्दीबळ खेळत. एकाचवेळी अनेक खेळाडूंशी बुध्दीबळ खेळण्याचे विक्रमही येथे रचले गेले.रात्री नऊ-दहाच्या सुमारास सुरू झालेल्या बुध्दीबळाचे हे सामने पहाटे सुर्योदयापर्यंत चालत असत.अशा बुध्दीबळाच्या रात्रभर चालणाऱ्या सामन्यावेळी खेळाडू तरतरी येण्यासाठी चहा-कॉफी, पान-तंबाखूचे सेवन करीत असत. शिवाय रात्रभर डाव सुरू असल्याने थकवा न येणारे पदार्थही ते खात असत. त्यामध्ये चिरमुरे आणि शेंगदाण्यांचा समावेश असे. त्यामुळे सुस्ती न येता बुध्दीबळाच्या डावाकडे मन एकाग्र करता येत असे. असाच बुध्दीबळाच्या खेळावेळी चिरमुरे, शेंगदाणे एकत्र करुन त्यांना तेल-तिखट लावून एक संमिश्र पदार्थ तयार करण्यात आला. हा खमंग पदार्थ खेळाडूंच्या पसंतीस उतरला.

प्रारंभी ‘भणंग’ नावाने ओळख

तो सुरूवातीला ‘भणंग’ या नावाने ओळखला जावू लागला. 1930 च्या दशकात सांगलीत भणंगचा जन्म झाला. त्यानंतर रात्री होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये भणंग पार्टी ही हमखास असायची. सन 1940 च्या दशकातील या भणंग पार्टीचे मोडी लिपीतील काही कागद मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना मिळाले आहेत. यामध्ये सांगलीत रात्री होणारे जागरण-गोंधळ, मित्रांच्या गप्पा-टप्पाच्या मैफिली, खेळांचे सामने यावेळी भणंग आणले असल्याचे उल्लेख आहेत. सन 1948 च्या एका कागदात जागरण कार्यक्रमाचा हिशोब लिहिताना चहा-पाणी, विडी-काडी, पान-तंबाखू यांच्या जोडीला भणंग आणल्याचा उल्लेख केला आहे. सरबराई खर्चात हा उल्लेख करताना हे सर्व पदार्थ मिळून 16 रुपये चारआणे खर्च झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर 1950 ते 60 च्या दरम्यानच्या काही कागदांत भणंगला काही ठिकाणी ‘भुनंग’ असेही म्हटले आहे. 1955 नंतर मात्र, भणंगचे नामांतर ‘भडंग’ असे झाल्याचे आढळून येते.

भडंगला नव्हती फारशी प्रतिष्ठा

सांगलीत जन्मलेला भडंग हा पदार्थ आज जरी जगभर मान्यता पावला असला तरी प्रारंभी त्याला फारशी प्रतिष्ठा नव्हती. सर्वसामान्य कुटुंबात एरव्ही खाल्ल्या जाणाऱ्या अन्य पदार्थात भडंगचा समावेश नव्हता. तो केवळ रात्री चालणाऱ्या मैफिली व अन्य कार्यक्रमातच वापरला जायचा. सुरूवातीलाच रात्रीच्या कार्यक्रमात खायचा पदार्थ असाच शिक्का भडंगवर बसला होता. मात्र, जसजशी भडंगची खमंग चव जिव्हा तृप्त करु लागली आणि भडंगचे ब्रँड सांगलीत तयार होऊ लागले, तसतशी भडंगला समाजमान्यता आणि प्रतिष्ठा मिळत गेली आणि आज हा पदार्थ सांगलीचा ब्रँड बनला आहे.